डिजीटल मार्केटिंग मधील करियर, व्यवसायाच्या नाशिक्करांकरिता पर्याय

डिजीटल मार्केटिंग मधील करियर व व्यवसायाच्या नाशिक्करांकरिता पर्याय व संधी

Nashik Careers in Digital Marketing
Top 6 Careers & Freelancing Opportunities for Digital Marketers in Nashik
June 11, 2019
Crack your Digital Marketing Job Interview with these 21 Most Likely questions and their answers
February 10, 2020
Career options in Digital Marketing in Nashik

Career options in Digital Marketing in Nashik

लेखन – पवित्र टकले, वाचावयास लागणारा वेळ – सुमारे ८ मिनिटे

डिजीटल मार्केटिंग (अंकात्मक विपणन) पारंपारिक मार्केटिंग म्हणजेच रस्त्यावरील होर्डिंग्ज, वर्तमानपत्रातील जाहिराती, माहितीपत्र व इतर यांची जागा घेईल की नाही, हा मुळातच चुकीचा प्रश्न होईल, प्रश्न एवढाच आहे की ही प्रक्रिया किती पटकन होईल.

मोबाईल स्क्रीन, कॉम्प्युटर स्क्रीन यामध्ये बहुतांश लोकं बुडून गेलेली आहेत, फुटपाथवर चालतांना मोबाईलकडे बघण्याच्या नादात लोकं एकमेकांना धडकतात, सेल्फी काढतांना अपघात होतात, जणू काही आता सगळ्यांचा राहण्याचा पत्ता हा कुठले ना कुठले तरी डिजीटल स्क्रीन झाला आहे.

रिलायंस जिओ कंपनीने निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे इंटरनेट डेटा आता स्वस्त दरात उपलब्ध झालेला आहे, त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात डिजीटल उपकरणांचा झपाट्याने प्रसार होतो आहे. ज्या ग्राहकाला ज्या वेळेला एखाद्या वस्तूची किंवा सेवेची गरज असते, नेमके त्याच वेळेला त्या विषयी माहिती अथवा त्याची जाहिरात ही त्या व्यक्ती समोर झळकते व त्या व्यक्तीला (ग्राहकाला) विक्री करणाऱ्या संस्थेशी ताबडतोब संपर्क करता येतो ही डिजीटल मार्केटिंगची एक विशेष खुबी आहे.

वस्तू व सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा व वस्तूंचा उदयास्त होत राहील पण त्या वस्तू व सेवा विकण्याचा प्लॅटफॉर्म मात्र आता कायमस्वरूपी डिजीटल मार्केटिंग हाच असणार आहे.

डिजीटल मार्केटरचा उदय

वर उल्लेखित बाबींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की पारंपारिक व्यवसायात अदृश्य होत असलेले पर्याय व संधी ही डिजीटल मार्केटिंग मध्ये परिवर्तीत होत आहे.

आपल्या ग्राहकाचे संकेतस्थळ (वेबसाईट) गुगल सर्च इंजिनमध्ये प्रथम पानावर किंवा क्रमांकवारीत वरती ठेवणे, ग्राहकाचा व्यवसाय फेसबूकचे बिझनेस पेज वापरून तसेच इन्स्टाग्राम, लिंक्डइन व युट्यूबचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, त्यातून भरघोस विक्री करून देणे तसेच या सगळ्याकरिता लागणाऱ्या डिजीटल जाहिराती बनविणे व त्या जाहिराती अचूक त्या वेळेला त्या वस्तूची व सेवेची गरज असलेल्या ग्राहकापर्यंत पोहोचविणे हे डिजीटल मार्केटरचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. वर नमूद गोष्टींच्या व्यतिरिक्त अनेक बाबी या ह्या मार्केटरला सांभाळाव्या लागतात, परंतु त्याचा येथे उर्धृत करीत नाही.

 

करियर व व्यवसायातील पर्याय

डिजीटल प्रणालीमुळे अनेक नोकऱ्या व व्यवसाय धोक्यात असल्याबाबत हल्ली भीती निर्माण झालेली आहे, परंतु ग्राहक तर पूर्वीप्रमाणे वस्तू व सेवांचा उपभोग घेत आहे म्हणजे मागणी कमी झालेली नाही, परंतु एखाद्या वस्तूची मागणी करणे व त्याची पूर्तता करणे ह्या पद्धतींमध्ये मात्र झपाट्याने बदल होत आहे, म्हणजेच पारंपारिक मार्केटिंगकडून सर्व व्यवसाय अंकात्मक विपणनाकडे (डिजीटल मार्केटिंगकडे) जात आहेत आणि येथेच ह्या प्रकारच्या मार्केटरला असलेला प्रचंड वाव व भविष्यातल्या संधी लक्षात येतात. जो डिजीटल होईल तोच या स्पर्धात्मक व संगणकीय युगामध्ये टिकेल.

आता आपण ह्या संधी कुठे उपलब्ध आहेत ते बघुया –

१)        नाशिक कॉर्पोरेट / औद्योगिक वसाहत – नाशिकच्या आसपास सुमारे पाच औद्योगिक वसाहती आहेत व तेथील कारखान्यांना आपल्या वस्तूंची इतर उद्योगांना पार्टस म्हणून किंवा थेट ग्राहकांना संपूर्ण वस्तूची विक्री करावयाची आहे. ती यापूर्वी पारंपारिक पद्धतीने होत असे. आज या प्रत्येक कारखान्यात कमीतकमी एका डिजीटल मार्केटरची गरज निर्माण झालेली आहे. अशा प्रकारच्या छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कारखान्यांमध्ये डिजीटल मार्केटरला कंटेंट रायटिंग, एसईओ, डिजीटल जाहिराती बनविणे अशी सर्व कामे एकट्याने करावी लागतात व मासिक वेतन हे सर्वसाधारणपणे रु.१८,०००/- ते रु.३०,०००/- च्या दरम्यान असते. छोट्या व मध्यम कंपनीत काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला डिजीटल मार्केटिंगच्या सर्व पैलूंचा अनुभव मिळतो.

 

२)        फ्रीलान्सर (Freelancer) ला कुठल्याही व्यावसायिक जागेची गरज नाही. फक्त एक लॅपटॉप, डिजीटल विक्रीशास्त्राचे ज्ञान व घरामध्ये एक टेबल-खुर्ची इतक्या अल्प भांडवलावर आपण फ्रीलान्सर होऊ शकता. Freelancerशहरातील छोटे मोठे दुकानदार, औद्योगिक छोटे कारखाने, डॉक्टर, आर्किटेक्ट, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट ह्या सगळ्यांना डिजीटल मार्केटिंगची गरज भासते आहे व ती सेवा व्यावसायिक पद्धतीने करून देणाऱ्या निष्णात व्यक्तींचा तुटवडा आहे व ह्यामध्ये आत्ता व येणाऱ्या नजीकच्या काळात बरीच व्यावसायिक संधी आहे. फ्रीलान्सरचा व्यवसाय मोठा झाल्यानंतर तो/ती स्वतःची एजन्सी टाकू शकतात व स्वतःच्या एजन्सीमध्ये ग्राफिक डिझायनर्स तसेच अॅनिमेटर्स यांची नियुक्ती करून स्वतःचा व्यवसाय आणखी वाढवू शकतात. नोकरी करून मासिक वेतन मिळविण्यापेक्षा फ्रीलान्सरला मध्यम ते दीर्घ काळामध्ये अनेक पटीने जास्ती आर्थिक प्राप्ती होऊ शकते. अधी अनुभवाकरिता नोकरी करून मग स्वतःचा व्यवसाय टाकणाऱ्यांची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत.

 

३)        कंटेंट रायटर (Content  Writer) – मराठीमध्ये आपण याला सर्वसाधारणपणे लेखन सामग्री लिहिणारी व्यक्ती असे संबोधतो. अनेक लोकांना हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल की कंटेंट रायटरला डिजीटल मार्केटिंगमध्ये सर्वाधिक मोबदला व मागणी आहे. आपण जर पु. ल. देशपांडे, जॉन ग्रिशॅम, काकोडकर, व. पु. काळे किंवा इतर कोणतीही मराठी किंवा इंग्रजी पुस्तके अनेक काळापासून वाचत असाल व आपली वचनसंपदा समृद्ध असेल व त्यामुळे आपल्याला जर सर्जनशील (क्रिएटिव्ह) परंतु ग्राहकाला आकर्षित करता येईल असे लेखन करता येत असेल तर डिजीटल मार्केटिंगच्या जवळजवळ सर्व पैलूंमध्ये अशा व्यक्तीची गरज असते. अशा व्यक्तीला आजूबाजूचा समाज व त्यांची नस ओळखण्याची खुबी हवी किंवा ती प्रॅक्टिसने आत्मसात करून घेतली पाहिजे. कंटेंट मार्केटरने आपले लिखाण हे व्याकरण आणि स्पेलिंग्ज यातील शुद्धता कायम ठेवून काम केले पाहिजे. संकेतस्थळाला, ब्लॉग्जना, अंकांकित जाहिरातींना लागणारा सर्व मजकूर हा कंटेंट रायटर लिहितात व मोठ्या जाहिरात एजन्सीज मध्ये अशा लोकांना रु.५,००,०००/- प्रति महिना मागणी आहे. प्रसून जोशी हे कंटेंट रायटिंग मधले अतिउच्च उदाहरण आहे.

 

४)        व्यावसायीकांकरिता रेप्युटेशन मॅनेजमेंट – असे अनेक व्यवसाय आहेत की ज्यांना कायद्याने व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेंमुळे स्वतःची उघड उघड जाहिरात करता येत नाही. उदा – डॉक्टर्स, वकिल तसेच आर्किटेक्टस, अशा व्यक्तींकरिता तसेच सेलेब्रिटीज म्हणजेच प्रकाश झोतात असलेल्या व्यक्तींचे कायद्याचे चाकोरीमध्ये राहून तसेच वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करावे लागते व त्याला रेप्युटेशन मॅनेजमेंट असे म्हणतात. झपाट्याने या प्रकारचे प्रमोशन हे आता डिजीटल मंचाद्वारे होत आहे. उदा – एखादा सर्जन हा आपण केलेल्या एखाद्या गुंतागुंतीच्या व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेविषयीची माहिती वा अगर व्हिडिओ युट्यूबवर टाकू शकतो. कृष्णावेब डिजीटलमध्ये आम्ही आमच्या कोर्समध्ये याची इत्तम्भूत माहिती देतो.

 

५)        पारंपारिक, नामांकित जाहिरात कंपनीमध्ये काम करणे – पारंपारिक जाहिरात कंपन्या झपाट्याने अंकांकित प्लॅटफॉर्म अंगीकृत करीत आहेत. त्यांच्याकडे आधीचे जुने संबंध असलेले ग्राहक रेडीमेड आहेत. अशा परिस्थितीत डिजीटल मार्केटरला अनुभव घेण्याकरिता तसेच त्या फर्म्समध्ये मोलाचा वाटा उचलण्याची संधी आहे. अशा कंपन्यांकडे कंटेंट रायटर, ग्राफिक डिझायनर वगैरे आधीपासूनच कार्यरत असतात, त्यामुळे डिजीटल मार्केटरला तेथे त्याच्या मुख्य कामावर जोर देऊन त्यामध्ये मौल्यवान अनुभव मिळतो. अशा प्रकारच्या कामाकरिता सुरुवातीला सुमारे रु.१५,०००/- ते रु.२७,०००/- मासिक वेतन नाशकात मिळावयास हरकत नाही.

 

६)        परदेशी फर्म्स करिता काम करणे – डिजीटल मार्केटिंग मधील अनेक बाबी अशा असतात की ज्या परदेशातल्या कंपन्या भारतात ऑफलोड करतात,Overseas opportunities from your home office जिथे त्यांना परदेशात ताशी ५० ते ७० डॉलर म्हणजेच रु.३,५००/- ते रु.४,९००/- रुपये द्यावे लागतील त्या ठिकाणी भारतातील डिजीटल मार्केटरला त्यांना ताशी १५ ते २५ डॉलर म्हणजेच रु.१,०००/- ते रु.१,३००/- द्यावे लागतात. भारतीय डिजीटल मार्केटरला ताशी रु.१,२००/- हा मोबदला उत्तम वाटतो. अशा कामाकरिता अनेक वेळेला अमेरिकेतील किंवा युरोपमधील वेळेनुसार म्हणजेच आपल्या येथील रात्री-बेरात्री काम करावे लागते. कामाचे अचूक नियोजन व कोणतीही चूक नसलेले (meticulous) एग्झीक्युशन करावे लागते, थोड्या चुका केल्यानंतर देखील जॉबवर्क जाण्याची शक्यता असते. इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व ही या प्रकारच्या मार्केटिंगची प्रमुख गरज आहे.

कृष्णावेब डिजीटलमध्ये आम्ही औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या तसेच शहरातील व्यावसायिक, छोटे मोठे बिझनेस व परदेशातील आउटसोर्स करणाऱ्या कंपन्या यांच्याशी आम्ही सतत संपर्कात असतो व आमच्या विद्यार्थ्यांकरिता करियर तसेच व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असतो.

डिजीटल मार्केटिंगमध्ये वर नमूद ६ पर्यायांव्यतिरिक्त अनेक इतर पर्याय उपलब्ध आहेत. येथे फक्त ढोबळमानाने माहिती देण्याचा प्रयत्न आहे.

कृष्णावेब डिजीटल ही भारतातील अग्रगण्य डिजीटल मार्केटिंग ट्रेनिंग आणि प्रोजेक्ट्स स्वीकारणारी संस्था आहे, अधिक माहितीकरिता आमच्या होमपेज वरती क्लिक करा अथवा आमच्या संस्थेला भेट द्या.

Comments are closed.